| मुंबई | देशात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. कोरोना सारख्या धोकादायक विषाणूसोबत दोन हात करताना या वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत. आपल्या सोशल मीडियाचा DP बदलून सेलिब्रिटींनी महाराष्ट्र पोलिसांचं प्रतिक चिन्ह लावलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, अभिनेता अक्षय कुमार यांनी महाराष्ट्र पुलिस, मंत्री जयंत पाटील यांनी पोलिसांच्या कार्याचा सन्मान करत आपले DP बदलले आहेत.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन जगातील सर्व मान्यताप्राप्त लोकांचे मनापासून आभार मानले आहेत. भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा हा मोठा प्रश्न आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुढे येवून ठेपला आहे.I stand in solidarity with Maharashtra police @DGPMaharashtra.
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 10, 2020
Thank u to @AnilDeshmukhNCP @MumbaiPolice for relentless efforts in the face of this adversity. Very grateful to doctors, medical staff, health workers who are leading the fight against the virus on the frontlines. pic.twitter.com/u8Rq7RWjr5
A big THANK YOU to the Maharashtra Police & the Police Forces across India who have been tirelessly working 24/7 to keep us safe.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 10, 2020
Jai Hind 🇮🇳
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .