रामदेव बाबांच्या पतंजलीच्या औषधाला केंद्राकडून स्थगिती..!

| मुंबई / नवी दिल्ली | कोरोनाचा उपचार शोधल्याच्या पतंजलीच्या दाव्यावर केंद्र सरकारने सध्या स्थगिती आणली आहे. केंद्राने म्हटले की, मीडियात पतंजली दावा केला आहे की, त्यांनी कोरोनाचे औषध शोधले आहे. दरम्यान, केंद्राने पतंजलीला या औषधाची माहिती देण्यास आणि तपास होईपर्यंत याची जाहिरात आणि विक्री न करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी योग गुरु बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक औषधाच्या वापरातून कोरोनाचा उपचार होण्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोनिल नावाची टॅबलेट लॉन्च केली आहे. त्यांनी म्हटले की कोरोनिलमध्ये गिलोय, तुळस आणि अश्वगंधा आहे, जी इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. हे औषध क्रॉनिक आजारांपासूनही बचाव करते. याला पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट आणि नेशनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंस (निम्स) यूनिवर्सिटी, जयपूरने मिळून तयार केले आहे.

१०० रुग्णांवर क्लीनिकल कंट्रोल ट्रायल

रामदेव यांचा दावा आहे की, कोरोनिलच्या क्लीनिकल केस स्टडीमध्ये १८० रुग्णांना सामील करण्यात आले होते. त्यातील १०० रुग्णांवर क्लीनिकल कंट्रोल ट्रायल करण्यात आली. ३ दिवसांच्या आत ६९% रुग्ण ठीक झाले आणि ७ दिवसात १००% रुग्ण निरोगी झाले.

५४५ रुपयात मिळेल ३ औषधांचे कोरोना किट

रामदेव यांनी जे कोरोना किट लॉन्च केले आहे, त्यात कोरोनिलशिवाय श्वासारी वटी आणि अणु तेलदेखील आहे. रामदेव यांचे म्हणने आहे की, या तिन्ही वस्तुंच्या सोबत वापराने कोरोनाचा खात्मा होतो. हे किट ५४५ रुपयात मिळेल, यात ३० दिवसांचा डोस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *