केंद्र सरकारचा आयएफएससी बाबतचा निर्णय आकसापोटी..?| मुंबई | शहरातील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीच हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. हे मुख्यालय गांधीनगर, गुजरात येथे असणार आहे.

सध्या, आयएफएससीमधील बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रांचे अनेक नियामक – आरबीआय, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणद्वारे नियमन केले जाते. अधिसूचनेनुसार आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना २७ एप्रिल २०२० ला केली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गांधीनगर, गुजरात येथे असेल, अशी माहिती यात आहे. 

दरम्यान हा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्र दिनी आल्याने सोशल मीडियातून केंद्र सरकारवर प्रचंड टीका होत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे केंद्र गुजरातला नेण्याचा डाव असल्याचे देखील या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण व्यक्त होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *