साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेनन याचा मृत्यू..!

| नाशिक | १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन याचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. गेल्या २ वर्षांपासून युसूफ मेमन शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाला.

१९९३ मुंबईच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेमन (५४) याला शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह त्रास होऊ लागल्याने त्यात जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने मेमन याचे निधन झाले. औरंगाबाद कारागृहातून २०१८ मध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली होती.

औरंगाबाद कारागृहाच्या पूर्वी मेमन १९९३ पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २०१८ सालापासून मेमन नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याबाबत कारागृह प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमन देखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *