| मुंबई | महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने रेड आणि ऑरेंज झोन मधील क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी संचारबंदी संपेपर्यंत स्थगित करण्याबाबत निवेदन मा.शिक्षण मंत्री, मा.शिक्षण सचिव आणि अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांना दिले होते. दरम्यान त्या निवेदनावर आज रोजी मा. सचिव, राज्य मंडळ पुणे यांकडून शासनाच्या ०४ मे २०२० रोजीच्या निर्देशानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना विभागीय मंडळांना देण्यात आल्याचे पत्राद्वारे संघटनेला कळविण्यात आले आहे.
राज्य मंडळ फक्त शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहे. विभागीय मंडळानी रेड आणि ऑरेंज झोन मधील आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना शिक्षकांना संचारबंदी मधून सवलत देण्यासाठी मागणी केली आहे. आजपर्यंत तरी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी अशी कोणतीही परवानगी शिक्षकांना दिलेली नाही. आणि यापुढेही परवानगी मिळणे कठीणच आहे, असे मुंबई उपाध्यक्ष श्री.आलोक शर्मा यांनी सांगितले.
“रेड झोन आणि ऑरेंज झोन मधील उत्तरपत्रिका तपासणी ही संचारबंदी नंतरच”, या मागणीवर आम्ही महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ठाम आहे आणि मागणी पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर आपला पाठपुरावा सुरू आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आपले प्रयत्न हे चालूच राहणार असल्याचे संघटनेचे कोषाध्यक्ष श्री.हेमंत घोरपडे यांनी सांगितले
संपूर्ण महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज झोनमध्ये संचारबंदी असताना, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कोणत्याही शिक्षकाने उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यासाठी किंवा तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी केले.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री