मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अलिबाग दौऱ्यावर..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळाचे केंद्रबिंदू अलिबाग पट्ट्यात असल्याने या भागात अधिकचे नुकसान झाले आहे.(uddhav Thackeray on Alibag tour)

त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असेल. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील.

निसर्ग चक्रीवादळ मागे अनेक पाऊलखुणा सोडून गेलं आहे. अनेकांचे संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.(uddhav Thackeray on Alibag tour)

असा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अलिबाग दौरा?

दुपारी १२.३० वाजता – मांडवा जेट्टी, येथे आगमन
दुपारी १२.३५ वाजता – मांडवा जेट्टी येथून अलिबाग येथे रवाना
दुपारी १२.५० वाजता – थळ (अलिबाग) येथे पोहोचणार. चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
दुपारी १.२० वाजता – थळ येथून अलिबाग येथे रवाना
दुपारी १.३५ वाजता – अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी करणार
दुपारी १.४० वाजता – मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयकडे रवाना
दुपारी १.५० वाजता – निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत आढावा बेठक (जिल्हाधिकारी कार्यालय रायगड)
दुपारी २.५० वाजता – मांडवा जेट्टीकडे रवाना

रविवारपासून नवीन लेखमाला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *