मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदासा येथील कोळसा खाणीचे उद्धघाटन..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात पहिलाच नवीन प्रकल्प सुरु होत आहे.(coal mine at nagpur)

 वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी झालेत.  दरम्यान, आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत आहे. १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरु होणार आहे.

दरम्यान, एकूण तीन खाणींचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. उर्वरित दोन मध्यप्रदेशमधील आहेत.(coal mine at nagpur)

नवी लेखमाला उद्यापासून…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *