| मुंबई | ‘कोरोना’ संकटामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्याच्या मार्गावर आहे. रेड झोन वगळता सध्या महाराष्ट्रात ५७हजार ७४५ उद्योगांना परवाने मिळाले असून २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.
#COVID19 संसर्गनंतरच्या उद्योगविश्वात महाराष्ट्राला महासंधी! विशेष कृती दल करतेय परदेशी कंपन्यांशी वाटाघाटी@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @bb_thorat @iAditiTatkare @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra @midc_india @MCCIA_Pune @CIIEvents pic.twitter.com/UnVY63kKCE
— Subhash Desai (@Subhash_Desai) May 10, 2020
उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. राज्यात २५ हजार कंपन्या सुरु झाल्या असून त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित वेबीनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.
पश्चिम महाराष्ट्रात ९ हजार १४७ कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. त्यापैकी ५ हजार ७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरु केले आहे. ]मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मेअखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करु नये, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.
वीज बिलात सवलत
स्थिर वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज देणार
राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरु असल्याचं देसाई यांनी सांगितलं. याशिवाय राज्य शासन लघु उद्योगांना इतर सुविधा पुरवण्याबाबत धोरण ठरवत आहे.
परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी
राज्यात परदेशी गुंतवणूक यावी, यासाठी वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. अनेक देश महाराष्ट्राकडे चौकशी करत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरु होणार असल्याने लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावे, अशी ग्वाही सुभाष देसाई यांनी दिली.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .