दिलासादायक : …. तर १५ ऑगस्ट पर्यंत भारतीय कोरोना वरील लस बाजारात येणार..!

| मुंबई | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत एक आशादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे ही लस लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकच्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीसाठी मान्यता देण्यात आली होती. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार ७ जुलैपासून मानवी चाचणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर १५ ऑगस्टपर्यंत ही लस लाँच करण्यात येईल. असं झाल्यास सर्वप्रथम भारत बायोटेकची COVAXIN ही लस कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *