या महापालिकेचे आयुक्त झाले कोरोनाबाधीत..!

| सोलापूर | सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवशंकर हे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत पूर्णवेळ हजर होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, पालिका आयुक्त शिवशंकर हे कोरोनाबाधित झाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वतःला गृह विलगीकरणात राहणे पसंत केले आहे.

गेल्या महिन्यात महापौर श्री कांचना यन्नम यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांच्यासह पती व मुलालाही कोरोनाने बाधित केले होते. यशस्वी उपचारानंतर महापौरांसह त्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आता पालिका प्रशासन प्रमुखही कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्या संपर्कात गृहमंत्री व आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधीही आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.