राज ठाकरेंना या खास मित्राकडून देखील शुभेच्छा..!

| मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनोख्या शब्दांत आपल्या मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरू करा, या राज ठाकरेंच्या मागणीवर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. मात्र आता त्याच राऊत यांनी आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *