राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये काँग्रेसला मिळणार ४ जागा..?

| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं त्यांनी सांगितलंय. संगमनेर शहरातील एका उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोरोना संसर्गाला सोप्प समजण्याची चूक न करण्याचं आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी भाषणातून केलं.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर या आपल्या मतदार संघात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते शेम्प्रो या संस्थेच्या इमारत व ट्रॅक्टर शो रुमचा उद्घाटन सोहळा पार पडला. नियोजित वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर थोरात यांनी उशीर होण्या मागचं कारण भाषणातून सांगितलं. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याच सांगत आजही अनेक इच्छुक आले असल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचं स्पष्ट केलं.

काय आहे विधानपरिषदेचं पक्षीय बलाबल?

राष्ट्रवादी काँग्रेस – १०
काँग्रेस – ८
शिवसेना – १४
भाजप – २३
लोकभारती – १
शेतकरी कामगार पक्ष – १
राष्ट्रीय समाज पक्ष – १
अपक्ष – ६
रिक्त – १४
एकूण – ७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *