माझ्या घराचे रुग्णालय करा..!

अभिनेते कमल हसन यांच्या भूमिकेला नेटकऱ्यांची वाहवा..!


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनला बॉलिवूडकरांनी आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनी पाठिंबा दर्शवला. अनेक बॉलिवूडकरांनी पंतप्रधान निधी खात्यात पैशांचीही मदत केली. तर बॉलिवूड अभिनेता कमल हासन यांनीही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, असं सांगितले. त्यामुळे सध्या कमल हसन  यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

कमल हसन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. तसेच रुग्णांनासाठी जागा कमी पडू नये म्हणून रेल्वेतही कोरोना संशयीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वे डब्यांचे रूग्णालयात रूपांतर केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी माझ्या घराचे रूग्णालयात रूपांतर करा असे सांगितले आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. प्रत्येकजण मदतीसाठी पुढे धावून येत आहे. अशातच कमल हासन यांनी थेट त्यांचे घर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी देत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची मदत केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *