कृष्णकुंज वर कोरोनाचा शिरकाव..!

| मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे कोरोनाने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याआधी राज ठाकरे यांचे दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षक यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *