#coronavirus- २ मे आजची आकडेवारी..!
ऑरेंज, ग्रीन झोन मध्ये सलून सह इतर दुकाने चालू..!



| मुंबई | आज  महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २७ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात, २ अमरावतीत, वसई-विरारमध्ये १, अमरावती जिल्ह्यात १, तर औरंगाबाद मनपातील १ मृत्यू आहे. या शिवाय प. बंगालमध्या एकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज झालेल्या ३६ मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. ३६ पैकी १९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. तर १६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी तिघांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरीही काही झोनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे सुरू होणार..

रेड झोन

  • बस, रिक्षा, टॅक्सी बंद राहणार
  • सलून बंद राहणार
  • ग्रामीणभागातील सर्व दुकाने नियम पाळून खुली करण्याचा निर्णय..
  • मात्रग्रामीण भागातील मॉल सुरू होणार नाही.
  • रेडझोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार..
  • वरील महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खासगी कार्यालय ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारीकार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणार, त्याखालील कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थिती अपेक्षित

ऑरेंज झोन

  • बस वाहतूक बंद राहणार
  • टॅक्सी, रिक्षा सेवा सुरू होणार, एक वाहक आणि दोन प्रवासी अशी परवानगी
  • सलून चालू होणार
  • खासगी कार्यालय ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणार
  • त्याखालील कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थिती अपेक्षित
    अत्यावश्यक सेवांसह आता इतर दुकान सुरू होणार (मॉल सोडून)

ग्रीन झोन

  • सगळं सुरु करायला परवानगी
  • ५० टक्के प्रवासी क्षमतेने ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू होणार..
  • बसच्या फेऱ्या ग्रीन झोनमध्येच असणार त्याच्या क्षेत्राबाहेर बस जाणार नाही
  • खासगीकार्यालय ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार
  • सरकारी कार्यालयात उपसचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणार
  • तर त्याखालील कर्मचाऱ्यांची 33 टक्के उपस्थिती अपेक्षित

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *