| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे १५७६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर ६ हजार ४५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात १०६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २९ हजार १०० इतकी झाली आहे. आज ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
#CORRECTION 1576 new #COVID19 positive cases & 49 deaths reported in Maharashtra today, taking the number of active* cases to 21467 & deaths to 1068. Total positive cases stand at 29100. Total 6564 patients have been recovered/discharged in state so far: Maharashtra Health Dept pic.twitter.com/kpmqslGZWj
— ANI (@ANI) May 15, 2020
आज राज्यात ४९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईत ३४, पुण्यात ६, अकोल्यात २, कल्याण डोंबिवलीत २, धुळ्यात २, पनवेलमध्ये १, जळगावमध्ये १ तर औरंगाबादमध्ये १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ महिला तर २० पुरुष आहेत. आज झालेल्या ४९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे २२ रुग्ण होते. तर ४० ते ५९ वर्षे वयोगटातले २३ रुग्ण होते. मृत्यू झालेल्या ४९ रुग्णांपैकी ३२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनाची लागण झाल्याने राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १०६८ झाली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा