| मुंबई | मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
510 new COVID19 positive cases, 18 deaths recorded in Mumbai today, taking the total number of positive cases to 9123, death toll 361: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/tOK1jYWhpA
— ANI (@ANI) May 4, 2020
धारावीत ६३२ रुग्ण
मुंबईतल्या धारावीत ४२ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीची रुग्णसंख्या ही ६३२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या धारावीत २० जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. ही माहितीही मुंबई महापालिकेनेच दिली आहे.
मुंबईतल्या धारावीत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जाते आहे. दरम्यान मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात ग्रीन झोन दिसला पाहिजे त्यादृष्टीने कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान आज कोरोना रुग्णांची नवी मुंबईत ३४ , कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात १८ ने वाढ झाली आहे.