#coronavirus मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ खात्यामध्ये २४७ कोटी रुपये जमा..
दानशूर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ... सामान्यांचा देखील थेट मदतीचा हात..!


दैनिक लोकशक्ती ऑनलाईन


मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक राज्य तसंच केंद्र सरकारला आर्थिक मदत करत आहेत. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत २४७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

एलआयसी गोल्डन जुबली फाऊंडेशनने गुरुवारी (१६ एप्रिल) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत केली आणि. त्यामुळे निधीमधील जमा रक्कम २४७ कोटींवर पोहोचली. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. 

कोरोना व्हायरसविरद्धच्या लढाईसाठी नागरिकांनी साथ देण्याचं आणि आर्थिक मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शक्य तेवढी मदत करा जेणेकरुन ही लढाई सोपी होईल. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने मदतीचे हात समोर आले. विद्यार्थी, तरुण वर्ग, वयोवृद्ध, खेळाडू, कलाकार, उद्योजक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक योगदान दिलं.

याशिवाय अदानी ग्रुप, मोतीलाल ओसवाल लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक अँड सेलो ग्रुप, शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, अजिंक्य रहाणे, विराट-अनुष्का, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अजय देवगण, वरुण धवन, शाहरुख खान यांसारख्या अनेक दिग्गजांनी, संस्थांनी विविध प्रकारची मदत केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *