अहमदनगर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले..!


अहमदनगर :- नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. नगरमध्ये कालपर्यंत 8 बाधित होते. त्यापैकी शहरातील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यास 2 दिवसांपूर्वी घरीही सोडण्यात आले होते. त्यामुळे नगरकरांची धाकधूक काहीशी कमी झाली होती.

परंतु नंतर शहरात तसेच जामखेडमध्ये असे एकूण 8 बाधित आढळलेले होते. बुधवारी (दि.१) पुण्याच्या एन.आय.व्ही.कडे 51 नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी (दि.२) दुपारी प्राप्त झाला. त्यापैकी 6 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्दोयामध्ये 2 परदेशी, 2 मुकुंदनगरचे तर 2 संगमनेर येथील नागरिक आहेत. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील आहे. बाधित व्यक्ती 17 ते 68 वर्षे वयोगटातील व्यक्ती असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *