
| मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरातील दहा शहरांमधील पाच हजार महाविद्यालयीन तरुणींना वेबिनारच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते मंगळवार, २१ जुलै रोजी या प्राशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम सुरु होत आहे. १६ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
१०० वेबिनार मधून राज्याच्या दहा शहरातील पाच हजार तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार मंगळवारी, २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भाषणाने होणार आहे. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलीस सायबर शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!