अज्ञात माथेफिरुंकडून ‘ राजगृहाची ‘ नासधूस..!

| मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (७ जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली आहे. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या असून घरातील कुंड्यांचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झालं आहे. माटुंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचं हे निवासस्थान आहे. खास ग्रंथासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधलं होतं. बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते म्हणाले की, “मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये, अशी विनंती मी करतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *