घ्या जाणून : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन साजरा करताना त्यामध्ये हा असतो फरक..!

आपण कधी यावर लक्ष दिले आहेत का की प्रजासत्ताक दिन ( २६ जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) रोजी झेंडा फडकवण्यात काय फरक आहे ते? तर चला जाणून घ्या या दोन्ही दिवशी ध्वजारोहणातील फरक काय..

✓ पहिला फरक – ध्वज फडकावणारी व्यक्ती :

यातला पहिला फरक म्हणजे १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात. याचं कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आलेलं नव्हतं. कारण तेव्हा देश प्रजासत्ताक नव्हता. राज्यघटनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकावतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी देशानं राज्यघटनेचा स्वीकार केला, देश प्रजासत्ताक झाला आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद अस्तित्वात आलं. त्यामुळे या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकावतात.

✓ दुसरा फरक – राष्ट्रध्वजाची जागा :

दुसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला ध्वज दांडीला खाली बांधलेला असतो. पंतप्रधान तो दोरीच्या सहाय्याने वर चढवतात आणि नंतर फडकावतात. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या यशाचं द्योतक म्हणून या दिवशी ध्वज खालून वर चढवला जातो. त्याउलट २६ जानेवारी रोजी ध्वज दांडीच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो. राष्ट्रपती दोरी खेचून तिथेच ध्वज फडकावतात. कारण या दिवशी देश आधीपासूनच स्वतंत्र होता आणि प्रजासत्ताक झाला.

✓ तिसरा फरक – ध्वज फडकावण्याचं ठिकाण :

तिसरा फरक म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून लाल किल्ल्यावरूनच ते देशाला उद्देशून भाषण करतात. तर २६ ऑगस्टला राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वज फडकावतात. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राजपथावरील पथसंचलनाला उपस्थिती लावतात.

✓ चौथा फरक – सांस्कृतिक कार्यक्रम :

संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर आयोजनासह साजरा केला जातो जेव्हाकी स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिवशी देश आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विलक्षणता दर्शवतो. जेव्हाकी स्वातंत्र्य दिन असे काही आयोजन नसतात.

✓ पाचवा फरक – इतर देशातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रण :

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समारंभात इतर देशातील प्रमुख अतिथींना आमंत्रण दिलं जातं. १५ ऑगस्टला मात्र तसे आमंत्रण दिले जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *