संपादकीय – उध्दव ठाकरे – महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख


कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपला देश आटोकाट प्रयत्न करतोय. तर देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यातच सोडून देण्यापासून ते कालपरवापर्यंत कोरोनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हाणून पाडेपर्यंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संयमी आणि संयत भूमिका दाखवली आहे. ठाकरे यांच्या या वेगळ्या छबीची भुरळ देशभरातील राजकारणी, माध्यमकर्मी आणि बॉलिवूडच्या कलाकारांवर देखील पडली आहे. अमेरिकेत देखील उध्दव ठाकरे यांचे कौतुक होत असल्याचे तेथील महाराष्ट्राचे विद्यार्थी अभिमानाने सांगत आहेत.  ट्विटरवर अनेक लोक ठाकरे यांचे कौतुक करत आहेत. काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर “उद्धव ठाकरे हे सुखद आश्चर्य ठरले आहेत” असे ट्विट केले आहे.

भारताती सर्वात जास्त रुग्ण आणि बळी हे महाराष्ट्रात गेले आहेत. राज्यात आजमितीला ७४८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मुंबई विमानतळावरील रेलचेल आणि दाटीवाटीने असणारी लोकवस्ती यांमुळे सर्वात जास्त रुग्ण आढळूनही ज्यापद्धतीने कोरोनाला समूहात जाण्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोखले आहे, त्याबाबत अनेकजण स्तुती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लावून कोरोनाविरोधातील लढाई सुरु केली होती. मात्र त्याआधीच ठाकरे यांनी राज्यात १४४ लावून जमावबंदी लावत ठिकठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांनी देखील ठाकरे यांचे कौतुक केले आहे. “ठाकरे हे पहिल्या दिवसापासून कोरोनाविरोधात योग्य तो संदेश देत आहेत. त्यांच्या बोलण्यात कुठेही नाटकीपणा दिसत नाही. शांत आणि संयमपणे ते भूमिका मांडत आहेत. आता त्यांनी फेक न्युजवर प्रहार केला आहे, हे चांगली गोष्ट आहे.” असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे. लोकमत चे संपादक राजा माने यांनीही उध्दव ठाकरे यांचे वात्सल्य कुटुंबप्रमुख म्हणून कौतुक केले आहे.. निखिल वागळे यांच्यासह अनेक माध्यमातील पत्रकारांनी देखील उध्दव यांना पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. अगदी स्वतःचे कुठलेही मार्केटिंग न करता आपुलकीने त्यांनी जो लढा सुरू ठेवला आहे तो सर्वांना आश्वासाकदर्शक असाच आहे.

बॉलिवूडमधील कलाकार आणि नेहमी स्पष्ट भूमिका घेणारे जावेद अख्तर यांनी देखील ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. “महाराष्ट्राने ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळली आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारचे कौतुक केले पाहीजे”, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर, सलीम मर्चंट, अनुपम सिन्हा आदींनीही ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सलाम केला आहे.

महत्वाचे म्हणजे सोशल मीडियातून महाराष्ट्रातील तरुण देखील उध्दव ठाकरे यांची स्तुती करत आहेत. 

मुद्द्याचं, उपयोगाचं आणि महत्वाचं तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. जे ह्या काळात सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. मला आत्मविश्वास आहे. त्यांनी ह्या काळात हे स्वत: सांगणं आवडलं. मी तुमच्यासोबत आहे असा संकेत आहे त्यात अफवा पसरवणाऱ्या, चुकीची माहिती देणार्या आणि धार्मिक तेढ निर्माण करा. मुख्यमंत्री आक्रस्ताळेपणा दाखवत बोलत नाहीत, उगाच मोठ्या गप्पा मारत नाहीत, वस्तुस्थितीचं भान सोडून काही मला पहा फुले वहा टाईप विधानं करत नाहीत. भावनांना हात घालण्याचा नित्य अजेंडा नसतो. डोळे लहान मोठे करत बोलणं नाही. मुख्यमंत्री दोन तीन दिवसांतून पुन्हा येईन पुन्हा येईन असं न म्हणता खरोखर येतात आणि सर्वसामान्यांचे वाटतात. त्यांनी वारंवार असं पुन्हा पुन्हा येत राहणं अच्छा लगता है.

रेणुका खोत या तरुणीची प्रातिनिधिक स्वरूपातील पोस्ट

एकंदरीत सामान्य व्यक्तींपासून नेते, अभिनेते, लेखक ,खेळाडू सगळ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून निर्माण झालेली उध्दव यांची छबी त्यांच्या धीरोदत्त नेतृत्वाची चुणूक आहे हे नक्की..!

प्राजक्त झावरे पाटील ( मुख्य संपादक)


1 Comment

  1. U. B. Thakre Saeb. Aspan Mahan Aahet Aani Aasa C M Maharastala labla He Aamce Bhagya Aahe Mhala Aabiman Aahe

    Aadrniy U. B. Thakre Sayeb Aapn Mhahan Aahet. Aasa C. M. Maharastala lable Mala Aaplya Aabiman Aahe.Aapan Pudche 2029 parent Chip-Ministra Aasavet Dhanyavad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *