सुदामाचे राजधन, राज ठाकरेंना बाळा नांदगावकर यांच्याकडून भावनिक शुभेच्छा..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून रोजी वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही शुभेच्छांचा वर्षाव काही थांबत नाही. राजनिष्ठ आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाळा नांदगावकर यांनी ‘सुदामाचे राजधन’ अशी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीचा दाखला दिला आहे. सुदामाकडे श्रीकृष्णाला द्यायला जसं काहीच नव्हतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्याकडे देखील राज ठाकरेंना द्यायला काहीच नसल्याचं ते म्हणतात. फक्त ‘निष्ठा’ अर्पण करू शकतो जी मी केली आहे. अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

“तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए” अशी ओळ लिहून बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टचा समारोप केला आहे. १४ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, पण यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ‘वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यकर्ते मला भेटायला येतात, पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. या वातावरणात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे कोणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नये. तुम्ही जिकडे असाल, तिथेच जनतेला मदत करा. याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील,’ असं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *