ENG vs WI: वेस्ट इंडिजनं चारली इंग्लंडला धुळ! हा ठरला मॅच विनर..!

| लंडन | इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजनं चार विकेटनं यजमानांना धुळ चारली आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १ – ० नं आघाडी देखील घेतली आहे. या सामन्याचा हिरो ठरला वेस्ट इंडिजचा फलंदाज जर्मेन ब्लॅकवूड. ब्लॅकवूडनं संघासाठी महत्त्वपूर्ण अशी ९५ धावांची खेळी केली. ब्लॅकवूडनं १५४ चेंडूत १४ चौकार लगावत ९५ धावा केल्या. शतकासाठी ५ धावांची गरज असताना ब्लॅकवूड इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या चेंडूवर बाद झाला. ब्लॅकवूडनं रोस्टन चेस सोबत चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण अशी ७३ धावांची भागीदारी केली. तर, शेन डोरिचसोबत पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. मुख्य म्हणजे या सामन्याआधी ब्लॅकवूडची लोकप्रियता कमी होती. आता मात्र तो रातोरात स्टार झाला आहे.

इंग्लंडनं वेस्ट इंडिजसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. ब्लॅकवूडनं हे लक्ष्य पाचव्या दिवशी ६ विकेट गमावत पूर्ण केले. दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना १६ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान कोरोना महामारी काळात झालेली ही पहिली कसोटी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *