
| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजत आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा देखील केली. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होण्याची शक्यता आहे.
याआधी निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याचं कारण देत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होता. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..