राजभवनात कोरोना मुळे खळबळ, राज्यपाल क्वारांटाईन..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाने कहर केला आहे. राजभवनावरील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत ५५ जणांचे अहवाल हाती आले आहे. यात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप ४५ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.

दरम्यान, मुंबईत बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अमिताभ बच्चन याचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावर देखील कोरोनाने शिरकाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *