मनोज तिवारी यांची हकालपट्टी..!

| नवी दिल्ली | राजकीयदृष्ट्या देशाचे नाक समजल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांची हकालपट्टी करून आदेशकुमार गुप्ता या नव्या चेहऱ्याच्या हाती दिल्लीचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे.(Expulsion of Manoj Tiwari)

छत्तीसगड व मणीपूर येथील प्रदेशाध्यक्षपदीही नव्या नियुक्त्या केल्या. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यकाळात त्यांच्याच हातून दिल्लीतील हा खांदेपालट भाजप नेतृत्वाने तडीस नेला आहे.

दिल्लीतल्या निवडणुकीनंतर मनोज तिवारी यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता, तथापि पक्षाने त्यावेळी त्यांचा राजीनामा नामंजूर केला होता.  अलिकडेच तिवारी यांचा लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.  तिवारी यांच्याजागी नियुक्ती झालेले आदेशकुमार गुप्ता पश्चिम पटेल नगरचे नगरसेवक आहेत. उत्तर दिल्लीचे महापौर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. गुप्ता यांच्या नियुक्तीनंतर भाजप आगामी काळात आपले सारे लक्ष महापालिका निवडणुकीवर केंद्रित करणार आहे.

छत्तीसगड भाजप अध्यक्षपदी नेमण्यात आलेले विष्णुदेव साय माजी केंद्रीय मंत्री आहेत. यापूर्वीही त्यांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. तर मणिपूरमध्येही भावनानंद सिंह यांच्याकडील जबाबदारी काढून ती एस. टिकेंद्र सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. (Expulsion of Manoj Tiwari)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *