फडणवीस भाजप नेत्यांसह दिल्लीत..! अमित शाह यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना भेटणार

| नवी दिल्ली | काँग्रेस प्रणित राज्य राजस्थानात राजकीय वादळ सुरू असताना महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. या ठिकाणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रात ४ भाजप नेते सुद्धा पोहोचले आहेत. यामध्ये आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. फडणवीस यांनी अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा केली हे अद्याप समोर आले नाही. तरीही या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली असे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंदर्भात फडणवीस आणि अमित शहा चर्चा केली. कोरोना परिस्थितीत केंद्राने राज्याकडे लक्ष घालावे अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. फडणवीस आपल्या या दौऱ्यात अमित शहांसह कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची देखील भेट घेणार आहेत. नुकतेच त्यांनी कोरोनामध्ये उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील पाठवले आहे. कोरोना काळात आम्ही सर्व प्रकारची मदत आणि चर्चा करायला तयार आहोत. कोरोनाची राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे फडणवीस यांनी पत्रातून म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *