फडणवीसांचे मेकअप प्रकरण : भाजपने दाखल केला सेनेवर गुन्हा..!

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंबई भाजपानं शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी भाजपानं नागपूरमध्ये पोलीस तक्रारदेखील दाखल केली आहे.  शुक्रवारी भाजपानं राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनाआधी देवेंद्र फडणवीस यांनी मेकअप केल्याचा दावा करण्यात आला. तसा एक फोटोदेखील व्हायरल झाला. त्यावरून भाजपानं शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. 

व्हायरल फोटोमध्ये एक मेकअप मॅन फडणवीस यांना मेकअप करताना दिसत आहे.  फडणवीस यांनी काळी पँट, पांढरा शर्ट आणि त्यावर निळं जॅकेट परिधान केलं आहे. महाराष्ट्र बचाओ आंदोलनादरम्यान फडणवीस यांनी हेच कपडे परिधान केले होते. फडणवीस मेकअप करून आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.  त्यावरून भाजपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

व्हायरल झालेला फोटो बदनामी करणारा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं. शिवसेनेच्या मुंबईतल्या टीमनं हा्हा टोयरल केल्याचा दावा त्यांनी केला. ‘आंदोलन करतानासुद्ध मेकअप मॅन सोबत, आता बोला आंदोलन होतं की फोटो शूट? ही लोक महाराष्ट्र वाचवणार,’ अशा आशयासह फडणवीसांचा फोटो व्हायरल झाला.

लोढा यांनी त्यांचे वकील हितेश जैन यांच्या माध्यमातून शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. व्हायरल करण्यात आलेला फडणवीस यांचा फोटो बराच जुना आहे. ते मुख्यमंत्री असताना नागपूरमधल्या रामगिरी बंगल्यावर फोटो काढण्यात आला होता, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. २२ मे रोजी महाराष्ट्र आंदोलनादरम्यान मी फडणवीस यांच्यासोबत हजर होतो. तिथे असा कोणताही प्रकार (मेकअप) झालेला नाही, असं लोढा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *