विशेष लेख – लार्निंग फ्रॉम होम : शिक्षण क्षेत्रात नव्याने रुजणारी संकल्पनासध्या परिस्थितीत सर्व क्षेत्रातील बंद अवस्था आपणास माहीत आहे मात्र मानवाला स्वयंपूर्ण बनवणारी शिक्षण व्यवस्था सुद्धा या मुळे बंद होताना दिसून येत आहे मात्र शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षण नव्हे. कारण शिक्षण ही प्रक्रिया फक्त समोरा समोरच घडते असे नाही, काहीवेळा ते औपचारिक सुद्धा असते तर काही वेळा अगदी घरात बसून काही तंत्रज्ञान च्या मदतीने सुद्धा या गोष्टी सहज साध्य होणाऱ्या आहेत. एकूणच काय तर साधनाची घरी गरज ही युद्धा वेळी असते असे जे म्हंटल्या जाते त्याप्रमाणे सध्या शिक्षण व्यवस्थेत साधने महत्त्वाचा रोल ठरतो आहे. घरी बसून शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना मला शिक्षण द्यायचं तर शिक्षकांकडे नुसती साधने असून चालणार नाहीत तर आपल्या सर्व विद्यार्थ्यां कडे तशी साधने आवश्यक आहेत तर या साधनांच्या मदतीने लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना उत्तमपणे यशस्वी होते. त्यापुढे जाऊन त्या साधनांना इंटरनेटची जोडणी असणे तितकेच महत्त्वाचे आहे तेंव्हा हे सहज शक्य असणार आहे. यात प्रामुख्याने नुसती साधने असणे आणि इंटरनेटच्या जोडणी सह साधने असणे हे दोन प्रकार लक्षात घेऊन आपणास ‘लर्निंग फ्रॉम होम’ हे यशस्वी राबवता येईल.

यात प्रामुख्याने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक सक्षमीकरण. जे शिक्षक या सर्व बाबी जाणतात तर हे करू शकतात आणि त्याचे प्रमाण आपल्या राज्यात कमी आहे हे आपण नक्की जाणतो व मान्य करावे लागणार आहे , म्हणजेच साधनां पलीकडे जाऊन प्रथम ते वापरणारे वापरकर्ते सक्षम असणं अथवा करणं ही प्राथमिक महत्त्वाची पायरी असेल व त्यानंतर वरील २ प्रकार असतील.

यातील पहिला ला प्रकार म्हणजे पालक व विद्यार्थी यांचेकडे स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप अशी साधने असून त्याला इंटरनेट जोडणी असल्यास व त्यांचा शिक्षक सक्षम असल्यास

 • तो दैनंदिन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे त्यांना शिकवू शकतो.
 • रेकॉरडेड व्हिडीओ बनवून सर्वच विद्यार्थ्यांमना पाठवणे व ते पाहून विद्यार्थ्यांनी शिकणे.
 • युट्युब अथवा फेसबुक पेजच्या माध्यमाने नियमित एक घटक घेऊन त्यादवरे शिकवणे हा एक महत्त्वपूर्ण भाग होऊ शकतो.
 • माध्यमिकअथवा उच्च माध्यमिक विदयार्थ्यांना साधने बहुतांश असतात तर ते शिक्षक दैनंदिन वेबिनर्स आयोजन करू शकतात, त्याचा आवाका जास्त व क्लिष्ट असतो त्यामुळे वेबिनर्स मध्ये छान स्पष्टीकरण करता येणे शक्य असते. 
 • विज्ञान शाखेतील मुलांना प्रात्यक्षिक शिकण्यासाठी जगभरातील उपलब्ध असणारे प्लेटफॉरम महिती करून सांगणे जसे, Khan Academy.
 • इंटरनेट असल्यामुळे दररोज ऑनलाईन टेस्ट पण देऊ शकतो त्याचा फीडबॅक घेऊ शकतोत.
 • जगभरातील गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या प्लॅटफॉर्म ची ओळख करून देऊन त्यावर कृतीयुक्त बाबी शिकण्याची संधी देऊ शकतोत.
 • माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना विषयानुसार दैनंदिन काही व्हिडीओ वेबिनर्स जगभरातील तज्ञांचे सुरू असतात तर त्याची माहिती मिळवून आपल्या विद्यार्थ्यांना देणे व त्यादवरे शिकण्यास प्रोत्साहित करणे.
 • स्मार्ट pdf हा एक सर्वोत्तम पर्याय आहे जो एकदा पूर्ण इयत्तेचा डाउनलोड करून घेता येतो व दररोज घटकानुसार अभ्यास करता येतो. या सर्व बाबी घरातील मोठी माणसे यांच्या निरीक्षणात घडणे सोयीस्कर असते म्हणून पालकांना आपल्या मुलांचे गुरू, सहायक ,मार्गदर्शकाची भूमिका निभवावी लागणार आहे.

तर दुसरा प्रकार साधने आहेत इंटरनेट नाही त्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसा अभ्यास घेऊन देऊ शकतो.

 • सर्व प्रथमतर यात ग्रुप व्हाईस कॉलिंग हा प्रकार वापरू शकतोत, इंटरनेट द्वारे शिक्षक याचा वापर करू शकतात म्हणजे फक्त शिक्षकांना इंटरनेट असले तरी चालते यात शिक्षक एकाच वेळी वर्गातील २० विद्यार्थ्यांमना कॉल करून आज एक विशिष्ट विषयातील एक विशिष्ट घटक यावर एकाच वेळी व्हाईस कॉल द्वारे मार्गदर्शन करतील व मुले घरी बसून आपल्या वहीत काही मुद्दे लिहतील व फोन झाल्यास अधिक विस्ताराने समजून घेतली घरातील मोठयांचे मदत घेतली अशी पद्धत वापरणे सोईचे असेल.
 • व्हाईसमेसेज याद्वारे सुद्धा आपण फोन आहे मात्र इंटरनेट नाही अशा विद्यार्थ्यांमना ३ ते ४ मिनिटे व्हाईस रेकॉर्डिंग करून एखादा घटक पाठवू शकता उदा, दळणवळण असा घटक आहे त्यावर शिक्षकांनी ३ मिनिटे व्हाईस रेकॉर्डिंग करावे मुलांना टेक्स्ट सारखे पाठवावे ते तो एकूण समजून घेतील व वहीत लिहतील.
 • स्मार्टफोन आहे मात्र इंटरनेट नाही तरीसुद्धा त्यामध्ये इंटरनेट शिवाय चालणारी विविध विषयांची विविध अॅप आहेत उदा इंग्रजी साठी बोलो अँप दररोज वापरा व इंग्रजी अभ्यास सुरू ठेवा.
 • स्मार्टफोन असल्यास त्यात गोष्टी नावाचे अॅप आहे तर त्यातील दररोज एक गोष्ट वाचतील, वाचलेली वहीत लिहतील, लिहलेली गोष्ट मोबाईलच्या व्हाईस रेकॉर्डिंग करतील म्हणजे त्याचं वाचन,लेखन व अभिव्यक्ती सर्व होईल याप्रकारे ऑफलाईन अॅप चा सर्वोत्तम उपयोग होऊ शकतो.
 • कधीतरी इंटरनेट असल्यास काही पीडीएफ फाईल पाठवू शकतोत ज्यामध्ये सर्व प्रकारच्या अभ्यास व भरपूर दिवस चालेल असा असतो. या शिवाय घरातील प्रत्येक व्यक्तींकडे एक कौशल्य असते उदा चित्रकला, नृत्य, कलाकुसर या बाबी घरबसल्या आपण आपल्या घराचाकडून सहज शिकू शकतो कारण सध्या घरी आहोत आणि वेळ सुद्धा आहे.

एकूणच सांगायचे झाल्यास साधनांच्या मदतीने समोर समोरच्या ऐवजी व्हर्च्युली शिकण्यावर भर द्यावा लागेल, दररोज तोच शिक्षक असेल असे नाही तर जगभरातील तज्ज्ञांच्या मदतीने शिकण्याचा सराव व सवय करून घ्यावी लागणार आहे तसेच नेमकं व योग्य साधने निवडण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे यात शिक्षक व पालक या दोहींचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, जरी शाळा बंद राहिल्या तरीही शिक्षण मात्र बंद राहणार नाही यासाठी वरील काही मार्ग जे आपल्या ला शक्य असतील, आपल्या कुवतीत असतील आशा मार्गाने गेल्यास शिक्षण उत्तमोत्तम सुरू राहील यात कोणतीही शंका असणार नाही.

बालाजी जाधव ( लेखक हे  गुगल इनोव्हेटर शिक्षक असून ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक देखील आहेत.) 2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *