अंतिम वर्ष परीक्षा : यूजीसी च्या मार्गदर्शक तत्वांविरोधात युवासेनेने दाखल केली याचिका..!

| मुंबई | कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्याने राज्यात परीक्षा घेणं शक्य नसल्याने शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्यावर ठाम मत प्रदर्शित केलं आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घेणं अनिवार्य असल्याने याविरोधात शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती युवासेनेचे वरुन सरदेसाई यांनी दिली.

वरुण सरदेसाई यांचे ट्विट :
https://twitter.com/SardesaiVarun/status/1284366355743948801?s=19

India has crossed 10lakh mark for Covid Cases. Yet @ugc_india is adamant on compulsory examinations. We have written to them and requested reconsideration multiple times but to no avail

Hence, Yuva Sena has filed a Writ Petition (PIL) in the Supreme Court of India.
@AUThackeray https://t.co/WPnZVfpdIW

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे, अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. आधीच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच, कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या याचिकेला युवक कॉंग्रेस चे सत्यजित तांबे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *