पाहिले स्वदेशी कोविड१९ टेस्ट कीट विकसित..!

| पुणे | कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुण्याने आणखी एक मोठं काम केलं आहे.  पुण्यातल्या National Institute of Virology ने पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट विकसित केली आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. शरिरात Antibodys तयार झाल्या की नाहीत याचा माहिती यातून मिळणार असून उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एका महिन्याच्या आता NIVने ही किट विकसित केली आहे.  अतिशय कमी खर्चात आणि जलद गतीने आता अशा प्रकारच्या टेस्ट करता येणार आहेत.  पुढील उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

अँटीबॉडी टेस्ट आणि आरटीपीसीआर काय आहे..?
जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही व्हायरसमुळे बाधित होते, त्यावेळी तिच्या शरीरात व्हायरशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. शरीरात असलेल्या अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी रॅपिड टेस्टची गरज असते. अँटीबॉडी टेस्टचा अहवाल अगदी कमी वेळात येतो. तर कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या RT PCR चा अहवाल येण्यासाठी जवळपास २४ तास लागतात.

अँटीबॉडी टेस्टसाठी रक्ताचा नमुना घेतला जातो. एक किंवा दोन थेंब रक्त घेऊन याची तपासणी केली जाते. ज्यामुळे शरीराच्या इम्युन सिस्टमने व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार केले आहेत की, नाही? यासंदर्भात माहिती मिळते. सध्या कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी रियल टाइम पीसीआर टेस्ट (RTPCR) करण्यात येतं. यामध्ये संबंधित रुग्णाचा स्वॅब सॅम्पल घेण्यात येतो.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती ही देशातच केली जाणार असून त्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *