इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल पेक्षा डिझेल महाग..!

| नवी दिल्ली | देशात सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही वाढली आहे. मागील १८ दिवसात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर १०.४८ रुपयांनी तर पेट्रोल ८.५० रुपयांनी वाढ झाली आहे.

बुधवारी दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत ०.४८ पैसे वाढली. त्यामुळे डिझेलची नवीन किंमत ७९.८८ तर पेट्रोलची किंमत ७९.७६ इतकी आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपयांवर स्थिर आहे. तर डिझेल ७८.२३ रुपये झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत आज ४६ पैशांची वाढ झाली. मंगळवारी मुंबईत डिझेल ७७.७६ रुपये होते.

तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ८१.४५ आणि ८३.४ रुपये आहे. तर डिझेलची किंमत अनुक्रमे ७०.६ आणि ७७.१७ इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *