युजीसीच्या माजी अध्यक्षांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, परीक्षा घेऊ नयेत या करिता दिले युजीसी ला पत्र..!

| मुंबई | युजीसीचे (विद्यापीठ अनुदान आयोग) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परिक्षेबाबत युजीसीने ६ जुलैला दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. युजीसी अध्यक्ष धीरेंद्र पाल सिंग यांना हे पत्र लिहून देशातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणीवर पुन्हा एकदा चर्चा करुन युजीसीने पुन्हा एकदा विचार करून सुधारित गाईडलाइन्स देशातील विद्यापीठांना देण्यात याव्यात, असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

थोरात यांच्या या पत्रात देशातील विविध विद्यापीठ, संस्थांच्या प्राध्यापकांच्या स्वाक्षरी या पत्रात आहेत. यामध्ये दिल्ली विद्यापीठ, TISS मुंबई, मुंबई विद्यापीठ यामध्ये कार्यरत असणाऱ्या २८ प्राध्यापकांनी यावर स्वाक्षरी केल्या असून हे पत्र युजीसीला पाठविण्यात आले आहे.

थोरात यांनी जे पत्र युजीसीला लिहलं आहे, त्यात त्यांनी ६ जुलै रोजी दिलेल्या गाईडलाइन्स या दुर्दैवी असून या गाईडलाइन्स आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जात असल्याचं सांगितलाय. या गाईडलाइन्सनुसार अंतिम वर्ष परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याच्या सूचना दिल्यानंतर अनेक राज्यांमध्ये परीक्षांबाबतची अनिश्चितता यामुळे वाढेल. ज्यांनी आधीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शिफारशी परीक्षांच्या मूल्यांच्या संशयावरून नव्हे तर अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीद्वारे सूचित करण्यात आल्या आहेत,” असे या पत्रात थोरात म्हटले आहे.

सुखसेव थोरात यांनी पत्रामध्ये युसीजीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यास दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य होऊ शकतात अस सांगितलं आहे. ज्यामध्ये एकतर सध्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत अनिश्चितता आहे ती दूर होईल, दुसरे म्हणजे परीक्षा रद्द करून समान सूत्राने गुण देऊन देशातील सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळेल. ऑनलाइन किंवा इतर पर्यायाने परीक्षा घेणे हे भेदभाव केल्यासारखं होईल. या विविध पर्यायांचा वापर केल्यास परीक्षा घेताना त्यावर कडक लक्ष देऊ न शकल्यास कॉपी सुद्धा केल्या जाऊ शकतात. त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइन पर्यायाने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा देताना समान न्याय मिळणार नाही, असं थोरात यांनी या पत्रात युजीसीकडे आपले विचार मांडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.