| मुंबई / वॉशिंग्टन | अमेरिकेत पोलिसांच्या हातून मारला गेलेला कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड कोरोनाबाधित होता. शवविच्छेदन केल्यावर ही माहिती आता समोर आली आहे. मृत्यूवेळीही जॉर्ज संक्रमित होता, परंतु त्याच्यात कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर सुरू झालेली निदर्शने अद्याप थांबलेली नाहीत. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासाच्या बाहेर निदर्शकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला नुकसान पोहोचविले आहे.(gorge floyd)
त्या संबंधी चालू घडामोड :
अमेरिकेतील पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फ्लॉयडच्या मृत्यूमुळे संतप्त निदर्शकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला रंग फासला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनी याप्रकरणी आमची माफी मान्य करावी असे देखील म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर समाजाला विभागण्याचा आणि अधिकारांचा गैरवापर करण्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण ट्रम्प यांनी ज्याप्रकारे हाताळले ते पाहता भीती वाटत असल्याचे मॅटिस म्हणाले. मॅटिस यांनी २०१८ मध्ये संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीरियातून सैन्य माघारीच्या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे नाराज होत मॅटिस यांनी हा निर्णय घेतला होता. अटलांटिका नियतकालिकात लेख लिहून मॅटिस यांनी कडाडून टीका केली आहे.(gorge floyd)नागरिकांना एकजूट करण्याचा / प्रयत्न न करणारे मी पाहिलेले पहिले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरले आहेत. किंबहुना ट्रम्प यांनी नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे मॅटिस म्हणाले. मॅटिस यांच्या या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी त्यांना ‘अहंकारी जनरल’ संबोधिले आहे. मॅटिस यांनी मंत्रिपदाचा त्याग केल्याने आनंदच झाल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे.(gorge floyd)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .