| मुंबई | कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी देशातील सर्वच देवस्थानचे सोने ताब्यात घेण्यासंदर्भात विधाने केले होते.
#Stimulus.@PMOindia Govt. must immediately appropriate all the gold lying with all the Religious Trusts in the country, worth at least $1 trillion, according to the #WorldGoldCouncil. The gold can be borrowed through gold bonds at a low interest rate. This is an emergency.PC
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
त्यावरुन, अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर काही भाजपा नेत्यांनीही चव्हाण यांना टार्गेट केले होते. याबाबत, पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे म्हटले. तसेच, देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एक उपायही सूचवला आहे. केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शनही केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका केली. तसेच, काही भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना टार्गेट करण्यात आले.
My suggestion of gold monetization from all religious trusts has been deliberately twisted and misrepresented by a particular section of bhakt media. Gold Deposit Scheme was originally started by A B Vajpeyee Govt in 1999. (1/2) pic.twitter.com/vzkgDQAfO2
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 14, 2020
याबाबत, स्वत: चव्हाण यांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे. देशातील सर्वच धर्मांच्या देवस्थानातील सोन्याबद्दल मी दिलेल्या सूचनेचे, काही भक्त मीडियाने विपर्यास वृत्तांकन केले. सन १९९९ मधील अटलबिहारी वायपेयी सरकारच्या काळातच, देशात सोने तारण योजना सुरु करण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. तर, मोदी सरकारने २०१५ मध्ये या योजनेचे नामांतर केले आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, अनेक देवस्थानांनी त्यांचे सोने तारण ठेवले आहे. त्यामुळे, माज्या वक्तव्याचा हेतुपूर्वक विपर्यास करणा-यांवर मी कारवाई करणार असल्याचेही चव्हाण यांनी ट्विटरवरु सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा