सरकार मराठा आरक्षण बाबत गंभीर , कोर्टात भक्कम बाजू मांडणार – अशोक चव्हाण

| मुंबई | मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अतिशय भक्कमपणे आपली बाजू मांडेल, त्या दृष्टीने शासनाने पूर्ण तयारी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ७ जुलै रोजी सुनावणी आहे. त्यादृष्टीनेही योग्य ती पावलं आम्ही उचलत आहोत असंही अशोक चव्हाण यांनी जाहीर केलंय.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विधी तज्ज्ञ मुकुल रोहतगी यांच्यासह एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आणि मी स्वत: उपस्थित होतो असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या वतीने अ‍ॅडव्होकेट साखरे, दिलीप चिटणीस हेदेखील या बैठकीत उपस्थित होते अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, सरकार मराठा आरक्षण बाबत गांभीर्याने आणि विचारपूर्वक पाऊले टाकत आहे , असा ठाम विश्वास मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *