
| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणा-या पावसाने मंगळवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत ३९१ मिमी पाऊस झाला. तर मालवण तालुक्यात सर्वाधिक ११२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार १५ ते १७ जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!