नागपूरात जुनी पेंशन हक्क संघटन द्वारा गरजूंना मदत..!

लॉकडाऊन मुळे अडकलेल्या गरजवतांना जीवनावश्यक किराणा वस्तुंचे वाटप

नागपूर :  कोरोना कोव्हीड १९ च्या संकटसमयी संपुर्ण देश १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असताना महाराष्ट्रातील विविध शहरात अनेक मजूर,हातावर ज्यांचे पोट आहे असे रोजंदारीवर काम करणारे अनेक संसार आज अडचणीत सापडलेले आहे. काहींची तर एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे.

अशा संकटसमयी समाजाला आपले ही काही देणे लागते या विचारातून दि ०२ एप्रिल २०२० ला श्रीराम नवमी च्या औचित्यावर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, टीम नागपुर द्वारा नागपुर मधील हुडकेश्वर, दिघोरी, कळमना या भागात अडकलेले मजूर व त्यांचे परिवार, लॉकडाऊन मुळे शहरात रोजंदारीवर पोट असणारे जवळपास ३२ परिवार यांना किराणा-किट देवून सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा खारीएवढा प्रयत्न करण्यात आला.

समाजाने समाजासाठी पुढे येणे ही आपली संस्कृती असून आज कोरोना मुळे कामगार आणि मजुरांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ते ज्या ठिकाणी काम करत होते त्याचं ठिकाणी लॉकडाऊन मुळे अडकल्याने व कामधंदा आणि जवळचा पैसा संपल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुद्धा यांच्यासमोर होता. काहीतर रोजंदारीवर काम करणारे परिवार आज कामचं नसल्याने दिवसभर उपाशी राहणे आणि रात्री मिळेल ते खाणे याचं परिस्थितीतून जात असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन कडून आवाहन केल्या नंतर हे काही गरजवंताचा शोध लागल्यानंतर आज रामनवमी च्या औचात्यावर संघटन च्या टीम नागपुर मधील २५ मित्र एकत्र येवून आज किमान ३२ कुटूंबांना किराना कीट ज्यात जीवनावश्यक वस्तुंचा समावेश होता ह्या पोहचविण्यात आल्या.

आम्ही सर्वांना मदत करीत असताना व किट चे वितरण करीत असताना कुठेही फोटो काढून सोशलमिडीयावर प्रसिद्ध करण्याचा मोह कटाक्षाने पाळला. सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे इतकंच आणि सोबतचं समाजातील विविध घटकांनी पुढे येवून गरजवतांपर्यंत पोहचण्याचे आवाहन आम्ही करत आहोत..

आशुतोष चौधरी, विभागप्रमुख


2 Comments

  1. अफलातून कार्य…सराहणीय…👌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *