| मुंबई | हेलपिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेतर्फे नवरत्न सन्मान सोहळा २०२२ या सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशन (H.S.M.O) ला सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा त्या संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरवच आहे. HSMO चे संस्थापक स्वप्नील शिरसाठ व सचिव रुपाली वाघुंडे, सदस्य अमोल जमदाडे यांनी हा नवरत्न पुरस्कार सन्मानाने स्वीकारला.
शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, तसेच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री महेंद्र तेरेदेसाई व गझलकार इरफान केसर उल जाफरी या मान्यवरांच्या हस्ते हा नवरत्न सन्मान या संस्थेला बहाल करण्यात आला.
या कार्यक्रमा दरम्यान सामाजिक विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. सामाजिक काम करत असताना अगदी तळागाळात जावून काम करणाऱ्या साथींना हा नवरत्न सन्मान देण्यात आला आहे, त्यामुळे सर्व स्तरातून या सोहळ्याचे कौतुक होत आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजन हेलपिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेचे संस्थापक समीर चव्हाण व प्रियांका कांबळे यांनी केले होते.