नागपूरात शंभरी पार..!
सतरंजीपूऱ्यातील ३० कुटूंब क्वारंटाईन..| • नागपूर |  संपुर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना कोव्हीड १९ या विषाणूने नागपुरमधील काही भाग आपल्या विळख्याखाली घेतलेला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा आता नागपूरमध्ये शंभरी पार गेलेला आहे.

पहिला रूग्ण सापडल्यापासून नागपूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले शहर होते जे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर नागपूर प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाने बर्याच अंशी कोरोनाच्या प्रसाराला आळा बसला होता. परंतू सतरंजीपुऱ्यातील एका कोरोनाग्रस्त वृद्धाच्या मृत्यूनंतर मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५० जणांच्या घरात व्यक्तिंना कोरोना ची लागण झाली. सोबतचं १०० च्या वर संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलेले होते.

म्हणून कोरोनाचा उद्रेक झाला नाही.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर प्रशासनाने सतरंजीपुऱ्यातील पहिला वृद्ध मयत झाल्यावर तातडीने पाऊले उचलली आणि मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन केल्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्यापासून नागपुर शहर बचावले.

सतरंजीपुऱ्यातील ३० कुटूंब क्वारंटाईन

अजुनही संतरजीपुरा मधील ३० कुटूंबातील अंदाजे १५० व्यक्तिंना क्वारंटाईन करण्यात आलेले असून पोलीस प्रशासनामार्फत संपुर्ण क्षेत्र सील करण्यात आलेले आहे. सोबतचं महानगरपालिकेकडुन संपुर्ण क्षेत्रात घरोघरी जावून सर्वेक्षण केल्या जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *