मैं एक फायटर हुं और मैं बहुत बढिया तरीके से लडा – सुशांतच्या दिलं बेचाराचा रिव्ह्यू वाचा..!

| मुंबई / विकास फुलसुंदर | सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट हॉट स्टार वर काल रिलीज झाला. त्यावर अक्षरशः प्रेक्षक तुटून पडले आहेत. ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा प्रीमियर शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवता हसवता रडवून जातो. या चित्रपटाची सुशांतचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाची क्रेज एवढी आहे की, शुक्रवारी संध्याकाळपासून ट्विटरवर पहिल्या स्थानावर #DilBecharaDay हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सध्या त्याला सर्वाधिक IMDB रँकिंग मिळाले आहे. त्याचा हा रिव्ह्यू..!

कालावधी : एक तास, 41 मिनिटे 26 सेकंद

स्टार : 3.5 तीन स्टार

का बघावा : सुशांतने आपल्या कामातून त्याचा अखेरचा सलाम आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे. वेगाने पाऊले उचलत जवळ येणा-या मृत्यूशी झुंज देत असलेल्या मॅनीच्या रुपातील सुशांतला आपण आपल्या आजुबाजुला अनुभवू शकतो.

चित्रपटाचा प्लॉट :

‘दिल बेचारा’ हा ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आनंदाने आयुष्य जगत दुसऱ्या व्यक्तीलाही आयुष्य जगायला शिकवणाऱ्या मॅनी (सुशांत सिंह राजपूत)ची ही कहाणी. किझी बासू (संजना सांघी) हिला थायरॉइड कॅन्सर असतो. तिच्या आयुष्यात डान्सर इम्मानुअल राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनीची एंट्री होते. मॅनी हा हसतमुख आणि बिनधास्त स्वभावाचा असतो, तर किझी तितकीच गंभीर आणि शांत असते. किझीचं दुःख कमी करण्यासाठी मॅनी त्याच्या परीने सर्व प्रयत्न करतो. तिला आयुष्याचं खरं महत्त्व समजावून सांगतो. तिच्या जगण्याला तो कारण बनतो. विशेष म्हणजे मॅनीलाही कॅन्सर असतो आणि आजारपणामुळे त्याला त्याचा एक पाय गमवावा लागतो. मात्र तो आयुष्य आनंदाने जगतो. किझीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तिला पॅरिसला घेऊन जातो. मॅनीच्या आयुष्यात जशी किझीची एंट्री होते, तसात तो कायमचा निघूनही जातो. त्याचा मृत्यू होतो. मात्र तो जाताना किझीला जगणं शिकवून जातो. अगदी हसवत हसवत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जातो.

सुशांतचे हृदयस्पर्शी संवाद :

• ‘जन्म कब लेना है और कब मरना है ये तो हम डिसाइड नहीं कर सकते, लेकिन कैसे जीना है ये हम डिसाइड करते हैं।’
• ‘जब कोई मर जाता है उसके साथ जीने की उम्मीद भी मर जाती है, पर मौत नहीं आती।’
• ‘मैं बहुत बड़े-बड़े सपने देखता हूं पर उन्हें पूरा करने का मन नहीं करता।’
• ‘प्यार नींद की तरह होता है धीरे-धीरे आता है और फिर आप उसमें खो जाते हैं।’
• ‘हीरो बनने के लिए पॉपुलर नहीं होना पड़ता, वो रियल लाइफ में भी होते हैं।’
• ‘मैं एक फाइटर हूं और मैं बहुत बढ़िया तरीके से लड़ा।’

सुशांतचा ताकदीचा अभिनय

दिग्दर्शक म्हणून मुकेश छाबरा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी सुशांतच्या अभिनय कौशल्याचा पुरेपुर वापर केला. जमशेदपूर ते पॅरिसपर्यंतची कथा उत्तमरित्या पडद्यावर चित्रीत करण्यात आली आहे. शशांक खेतान आणि सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात सुशांत आणि संजना यांच्यासह सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जी देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *