खडसेंबाबत मी केवळ दुःख व्यक्त करू शकतो – नितीन गडकरी

| नागपूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. त्याला काही प्रमाणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले असले तरी ते खडसेंना मान्य नसल्याने त्यांनी पुन्हा पलटवार केला होता. दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचं काम मोठं आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

 महाराष्ट्रात भाजप पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे यांनी भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अतिशय प्रतिकुल काळात त्यांनी पक्षाचं काम केलं आणि पक्षाला मोठं यश मिळवून दिलं. मात्र एकनाथ खडसे यांच्यासोबत जे सध्या झालं आहे, ते अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. एका पक्षाला मोठं करण्यात योगदान असलेल्या नेत्यावर अशी वेळ येणं याबाबत मी केवळ दु:ख व्यक्त करु शकतो.  यापेक्षा जास्त मला बोलता येणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

दरम्यान, नितीन गडकरी यांना देखील केंद्र स्तरावर साईड लाईन केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. परंतु आपल्या कामाच्या जोरावर ते तग धरून असल्याचे देखील.सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *