| पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे यांचं वक्तृत्व कौशल्याविषयी महाराष्ट्र चांगलेच परिचित आहे. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करतात, अशी त्यांची छबी देखील चिरपरिचित आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घेतलेला निर्णय तडीस नेणं. विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रानं याचा प्रत्यय विजय शिवतारे यांच्या पराभवावेळी घेतला. मात्र, याच निवडणुकीनंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी एक घोषणा केली होती. अखेर अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळला असल्याचं विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.
“मी जर ठरवलं, तर कुणी आमदार होऊ शकत नाही,” हे अजित पवारांचं एका प्रचार सभेतलं विधान निवडणुकीच्या प्रचारात चांगलंच गाजलं. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मतदार संघात झालेल्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी शिवतारेंना या शब्दात इशारा दिला होता. ” बघतोच कसा निवडून येतो..” असा थेट भरसभेत दिलेला शब्द अजितदादांनी शिवतारेंच्या पराभवाने पूर्ण केला होता.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांचा पुण्यात डिसेंबर मध्ये एक कार्यक्रम झाला. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना आमदार करणार, अशी घोषणा केली होती. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दोन उमेदवारांची नावं रविवारी जाहीर केली. त्यात एक नाव अमोल मिटकरी यांचं आहे.
२०१९मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी प्रचारात झोकून दिलं होतं. राष्ट्रवादीला मिळालेल्या यशात अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या प्रचार संभाचंही मोठं योगदान होतं. तसेच मिटकरी यांच्या रूपाने विदर्भात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील देखील राहू शकेल. तसेच राष्ट्रवादीच्या यशातील त्यांच्या योगदानाची दखल घेत अजित पवार यांनी अमोल मिटकरींना आमदार करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा आता पूर्ण होणार आहे. या निमित्ताने पुन्हा अजित दादा आणि त्यांचा शब्द यावर चर्चा झडू लागल्या आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .