लॉकडाऊन ला हरताळ फासत भाजपा लोकप्रतिनिधीची वाढदिवसाची पार्टी..!


  • कर्नाटकातील भाजप आमदाराने धूमधडाक्यात केले लग्न, दुसऱ्या भाजप आमदाराची बिर्याणी पार्टी याचे लोन महाराष्ट्रात..
  • पनवेल महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाची जंगी बर्थडे पार्टी
  • अटक होऊनही, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

पनवेल : देशभरात लॉकडाऊन असताना व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केलं जात असतानाही अनेक ठिकाणी याचं सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. लोकप्रतिनिधीही यात मागे नाहीत. लॉकडाऊनचं उल्लंघन करून मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणारे पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांना अटक करण्यात आली आहे.

पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी आयोजित केली जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. बहिरा हे आपल्या दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित असताना बहिरा यांनी हा प्रकार केल्यानं त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार असून ते काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *