राजकारणात पदे येतात जातात परंतु तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे – सभापती काशिनाथ दाते

| अहमदनगर | पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील श्री हनुमान मंदिर सभामंडपाचे लोकार्पण रु. १० लक्ष तसेच नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करणे रु. ८.७५ लक्ष भूमिपूजन माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, पंचायत समिती पारनेरचे सभापती गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, जिल्हा परिषद जलसंधारण समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे, पोपटराव चौधरी, दत्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले की या कार्यक्रमाला तालुक्यातील माझे सर्व सहकारी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे गटाचा सदस्य या नात्याने स्वागत करतो. राजकारणात पदे येतात जातात परंतु काम करत राहणे, तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन ठेवणे, जिल्हा परिषदेच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच तुम्ही गारगुंडी फाटा ते गारगुंडी ते चौंडी फाटा या रस्त्याची मागणी केली असून तो रस्ता फार खराब झालेला आहे. सदर रस्ता माझ्या जिल्हा परिषद सभापती कार्यकाळात करून देण्याची ग्वाही देतो असे आश्वासन सभापती श्री दाते सर यांनी दिले. तसेच कासारे व निवडुंगेवाडी कडून गारगुंडी कडे येणारा उर्वरित रस्ता पण पूर्ण करून देण्यात येईल असेही दाते सर यावेळी म्हणाले.

पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारगुंडी येथील स्वच्छतागृह, स्वयंपाक खोलीचे काम करून देण्यात येईल असे सांगितले आहे. तसेच मारुती मंदिरासमोर काही बाकडे देण्यात येईल असे सांगितले आहे.

यावेळी सरपंच निवृत्ती झावरे, चेअरमन सोपान झावरे ,माजी चेअरमन बबन दाते, माजी सरपंच बी डी झावरे गुरुजी, रमेश झावरे गुरुजी, विनायक ठुबे, आत्माराम ठुबे, बाजीराव झावरे, तुकाराम फापाळे, अर्जुन फापाळे, बाळासाहेब झावरे, माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, अंकुश झावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.के.झावरे गुरुजी यांनी केले तर आभार बी.डी. झावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *