उल्हासनगरात खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने ३०० बेडचे कोविड रुग्णालय..!

| उल्हासनगर | कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरातील कोविड रुग्णांच्या उपचाराठी सत्य साई प्लॅटिनियम रुग्णालयात ३०० बेडची सोय करण्यात आली आहे. हे रुग्णालय डेडीकेटेड कोविड रुग्णालय आहे. या आरोग्य सुविधेमुळे एकाचवेळी ३०० कोविड रुग्णांवर उपचार करणो शक्य होणार आहे. अवध्या दहा दिवसात हे रुग्णालय उभे केले आहे. त्यात सध्या पहिल्या टप्प्यात २०० बेड सज्ज आहे. आवश्यकता भासल्यास व रुग्ण वढल्यास आणखीन १०० बेडची तयारी ठेवली आहे.

२०० बेडवरील रुग्णांना ऑक्सीजनची सुविधा आहे. तसेच ३० बेडला व्हेटिंलेटरची सुविधा पुरविण्यात आली आहे. याशिवाय कोविड झालेल्या व डायलेसिस असलेल्या रुग्णाला अन्य रुग्णालयात डायलेसिस केले जात नाही. डायलेलीस कोविड रुग्णही या रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. सहा डायलेसिस रुग्णांकरीता ही सोय या ठिकाणी उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्याकरीता सहा बेड राखून ठेवण्यात आलेले आहेत. ऑपरेशन थिएटरची सुविधा याठिकाणी आहे. या रुग्णालयात वैद्यकीय स्टाफही देण्यात आला आहे. १२ डॉक्टर, ४० नर्स व अन्य १२० जणांचा स्टाफ या ठिकाणी रुग्णांची सेवा करणार आहे.

ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण या ठिकाणी कोविड रुग्णालये उभी केली जात आहे. त्याठिकाणी वैद्यकीय स्टाफची कमी होऊ नये यासाठी नर्सना दुप्पट पगार दिला जात आहे. त्यामुळे स्टाफची कमतरता भासणार नाही असा दावा खासदार शिंदे यांनी केला आहे. यावेळेस सदर रुग्णालयाची पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे, शिवसेना सभागृह नेते राजेंद्र चौधरी, उपमहापौर भगवान भालेराव, नगरसेवक धनंजय बोराडे, नगरसेवक अरुण आशाण, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *