भारतात इंटरनेटचा वाढता वापर..!

| नवी दिल्ली | देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. जगात सर्वाधिक इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारताचा क्रमांक आहे. एका रिपोर्टनुसार, येणाऱ्या पाच वर्षात भारतीयांकडून इंटरनेटचा जबरदस्त वापर होणार आहे.

भारतातील प्रति व्यक्ती महिन्याचा इंटरनेट डेटा, २०२५ पर्यंत २५ जीबीपर्यंत पोहचू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०१९ मध्ये प्रत्येक महिन्याला इंटरनेट डेटा वापरण्याचं प्रमाण १२ जीबी होतं, जागतिक स्तरावर हा इंटरनेटचा सर्वाधिक उपयोग आहे. टेलिकॉम उपकरणातील अग्रगण्य उत्पादक कंपनी एरिक्सनने जून २०२० च्या ‘मोबिलिटी रिपोर्ट’मध्ये म्हटलं आहे की, देशातील स्वस्त मोबाइल इंटरनेट आणि लोकांना सतत व्हिडिओ पाहण्याची सवय असणं या गोष्टी सर्वाधिक इंटरनेट वापरण्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं.

‘रपट’नुसार, देशात केवळ चार टक्के घरांमध्येच ब्रॉडब्रँड लाईन आहे. अशात इंटरनेटपर्यंत पोहचण्यासाठी स्मार्टफोनच प्रमुख मार्ग आहे. ‘रपट’नुसार, देशात इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर सुरु राहणार आहे.

एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टचे कार्यकारी संपादक आणि विपणन प्रमुख प्रतिक सरवाल यांनी सांगितलं की, देशात इंटरनेटचा वापर २०२५ पर्यंत तिप्पट होऊन २१ ईबी (Exabyte) होण्याचा अंदाज आहे. याचं कारणं म्हणजे, ग्रामीण भागासह देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढती संख्या आणि प्रति स्मार्टफोनच्या सरासरी इतकं इंटरनेट वापरातील वाढ हे आहे.

त्यांनी सांगितलं की, देशात २०२५ पर्यंत आणखी ४१ कोटी स्मार्टफोन जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत देशात प्रति व्यक्ती महिन्याचा डेटा वाढून तो २५ जीबी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *