भारत विरुद्ध चीन संघर्ष : जनतेला खरी माहिती मिळू नये म्हणून भारतीय वृत्तपत्रे, वेब साईट वर चीनची बंदी

| मुंबई / नवी दिल्ली | भारतीय वेबसाईट आणि वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी आणण्यापूर्वीच चीनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

चीनचे मुखपत्र असणारी वर्तमानपत्रे आणि वेबसाईटवरील बातम्या भारतीय वेबसाईटवर प्रसिद्ध होतात. तसेच पूर्व लडाखमधील सीमावादाशी संबंधित सर्व घडामोडींची माहिती भारतीय प्रसारमाध्यमे प्रसिद्ध करत आहेत. चीनमधील लोकांना भारतीय माध्यमांद्वारे योग्य माहिती मिळू नये, अशी भीती चीनला वाटत आहे.

चीनमधील मीडिया नियंत्रण हे सरकारचे (चीनमधील ऑनलाईन मीडिया सेन्सॉरशिप) म्हणजे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या संमतीशिवाय कोणीही काहीही लिहू शकत नाही. पण भारतीय मीडिया स्वतंत्र आहे. त्यामुळे भारतीय माध्यमांमध्ये दररोज गलवान खोऱ्याबद्दलच्या बातम्या येत असतात. याच बातम्या चीनमधील जनतेला समजू नये, हे या बंदीचे कारण असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *